आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय उपविजेता
बार्शी: वाय,सी,एम महाविद्यालय, करमाळा येथे संपन्न झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.

विजयी संघ – साईराज पिंगळे,सुरज घावटे,सौरभ रोडे, अक्षय लष्कर,समर्थ देशमुख, अक्षय देशमाने,अभिषेक खोटे, सुहास बारंगुळेे,विशाल राऊत, पृथ्वीराज हांडेबाग,अथर्व देशपांडे,गहिनीनाथ हरदडे,सुरज यादव,रामकृष्ण बरबडे, विकी मस्के,आदित्य ज्ञानमोटे यांचा समावेश होता.

या विजयाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय यादव,उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी.पाटील,सहसचिव अरुण देबडवार,खजिनदार जयकुमार शितोळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख,प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विजय संघास शारीरिक शिक्षण संचालक डॉ.हरिदास बारसकर,डॉ.विजयानंद निंबाळकर,डॉ.रामहरी नागटिळक,प्रा.संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.