धक्कादायक बार्शी कोरोना 200 पार : सोमवारी ही १९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ , तर बार्शी शहरात सापडले ११ रुग्ण
बार्शी :बार्शी तालुक्याचा सोमवार दि १३ जुलै रोजी आलेल्या अहवालात १९ रुग्ण पॉझिटिव्ह तर यातील बार्शी शहरात ११ रुग्ण आढळल्याने सर्वत्र कोरोना विषयी नागरिंकामध्ये भीतीचे वातावरण आहे .

गेल्या काही दिवसां पासुन झपाट्याने बार्शी शहरासह वैराग व संपूर्ण तालुक्यातच कोरोना विषाणूने थैमान घातले असुन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच दिवसेंदिवस शहरात व तालुक्यात कंटेनमेंट झोनच्या संख्येमध्येही वाढ होत आहे.

सोमवार दि १३ रोजी आलेल्या अहवालात बार्शी शहरातील व्हनकळस प्लॉट – १ मांगडे चाळ -२ भवानी पेठ -१ नाईकवाडी प्लॉट – १ सुभाष नगर -१ घोडके प्लॉट – १ कसबा पेठ -१ माळी गल्ली -१ रोडगा रस्ता -१ आगळगाव रोड – १ असे शहरात ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
तर ग्रामिण भागातील वैराग -२,मुंगशी आर -१, काळे गाव -१ सौंदरे -१ बावी -१,सासुरे -१, घाणेगाव -१ असे ८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बार्शी तालुक्यात एकुण १९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात आता एकुण रुग्णांची संख्या १९७ पोहचली आहे.

यामध्ये बाहेर पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांचा समावेश नाही. प्रत्यक्षात आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. आत्तापर्यत ८ जण मयत झाले आहेत . यापैकी १४७ रुग्णांवर उपचार सुरु असुन आतापर्यत ४२ रुग्ण बरे झाले आहेत .