धक्कादायक : बार्शी तालुक्‍यात सोमवारी आढळले 42 कोरोना बधित

0
201

कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज

बार्शी  : बार्शी शहर व तालुक्‍यातील मागील दोन-तीन महिन्यांत कोरोना बधितांचा आकडा हा कमी झाला होता.  मात्र  मागील आठवड्यापासून हा आकडा हळूहळू वाढू लागला आहे.शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात  50 पेक्षा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी एक दिवसात तब्बल 42 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गायकवाड यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यात बार्शी शहरात 26 तर ग्रामीण भागातील 16 जणांचा समावेश आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.एक जण मयत झाला तर5 जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले. शहरात व्यापाऱ्यांच्या टेस्ट दररोज केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.

बार्शी शहर मोठी व्यापारी पेठ असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून विना मास्क फिरणारे नागरिक, दुकानात गर्दी करणारे व्यापारी यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. तरी देखील कित्येक लोक विनामस्क फिरत आहेत. गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. लग्न समारंभात कोरोना नियमाचे पालन केले जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here