
धक्कादायक : बार्शी तालुक्यात १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ , एकुण संख्या झाली – १४०
१९ अहवालापैकी १९ पॉझिटिव्ह
अद्याप १५८ अहवाल प्रलंबित
बार्शी :बार्शी तालुक्याच्या दि १० जुलै रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने उडाली आहे.यामध्ये बार्शी शहरातील ८ अहवाल, वैराग ६ अहवाल , नागोबाचीवाडी – १ , वानेवाडी -१ तर बार्शी येथे उपचार घेत असलेले इतर -३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसापासुन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसुन येत आहे शुक्रवारी (ता. १०) रात्री जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार १९ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरातील आठ स्वॅबचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये बारंगुळे प्लॉट दोन, जावळे प्लॉट एक, सुभाषनगर पाण्याच्या टाकीजवळ एक, मनगिरे मळा एक, जयशंकर मिल लहूजी वस्ताद चौक दोन, तानाजी चौक एक असे आठजण पॉझिटिव्ह आले आहेत.

वैराग येथील सहाजण पॉझिटिव्ह आले असून, शिवाजीनगर येथील दोन, चाटी गल्ली येथील तीन, रिकाम टेकडी येथील एक असे आहेत. तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील एक, वाणेवाडी एक, तर बार्शी येथे उपचार घेत असलेले चिंचगाव टेकडी (ता. माढा) एक, पारडी (ता. वाशी) निजामदुरा गल्ली (ता. परांडा) एक असे पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
तालुक्यातील बार्शी शहरातील ६५, वैराग ५६, नागोबाचीवाडी पाच, बाभळगाव एक, साकतपिंपरी पाच, मुंगशी एक, खांडवी १४, पिंपळगाव सात, मांडेगाव एक, वांगी (ता. भूम) एक, शेटफळ (ता. मोहोळ) एक असे १५८ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे तालुका आरोग्य अधिकारीडॉ. संतोष जोगदंड यांनी सांगितले.

