धक्कादायक: सोलापूर शहरात शुक्रवारी कोरोनाचे10 बळी,308 नवे पॉझिटिव्ह

0
92

सोलापूर: सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज एकाच दिवशी कोरोनाने दहा जणांचा बळी घेतला आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि. 2 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 308 रुग्ण आढळले असून यामध्ये 157 पुरुष तर 151 स्त्रियांचा समावेश आहे.


आज शुक्रवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 2429 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2121 निगेटीव्ह तर 308 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 133जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

कोरोनामुळे आज दहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here