बार्शीतील शिरिष ताटे ३ महिन्यासाठी जिल्हयातुन तडीपार तर शहरातील एका नगरसेवकासह १७ जणांचा तडीपारचा प्रस्ताव एसपीकडे सादर
पो.नि. संतोष गिरिगोसावी यांची माहीती
बार्शी प्रतिनिधी
बार्शी शहरातील शिरिष धनंजय ताटे (रा.कोठारी गॅस एजन्सी समोर बार्शी ) यास सोलापुर जिल्हयातुन ३ महीन्यासाठी तडीपारची कारवाई करण्यात आली.

तर बार्शी शहरातील रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार व अवैध धंदे करणारे असे १७ गुन्हेगार यामध्ये एका नगरसेवकाचाही समावेश आहे. सोलापुर व उस्मानाबाद जिल्हयातुन तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांचेकडे पाठविला असुन लवकरच त्यांचेवर आदेश प्राप्त करून संबधित १७ जणांवर तडीपारची कारवाई होणार असल्याची माहीती पोलिस निरिक्षक संतोष गिरिगोसावी यांनी दिली.

सदर २०१९ व २०२०मध्ये एकत्रित गुन्हे केल्याने तसेच मागील रेकॉर्ड पाहुन पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांचेकडे पाठविलेल्या प्रस्तावात नगरसेवक रोहीत लाकाळ, प्रेम लाकाळ, सागर लाकाळ, आकाश लाकाळ, विजय माने (सर्व रा. पाटील चाळ,बार्शी ) तर अवैध व्यवसाय करणारे सोमनाथ पिसे (रा.सुभाष नगर,बार्शी ) हरिदास सुतार रा भगवंत मंदीरामागे )

नाना कांबळे (रा.सोलापुर रोड बार्शी ) सुधीर उर्फ दादासाहेब काकडे (रा.उपळाई रोड, बार्शी), भगवान अंबऋषी राऊत (रा. बार्शी ), अरुण गणपत म्हातेकर रा.मंगळवार पेठ बार्शी ) ,प्रकाश बाबुराव शिंदे (रा.सुतारनेट बार्शी), धवल गणेश बदाले (रा. कापसे बोळ बार्शी), राहुल कैलास घोंगडे रा.धारूरकर बोळ राऊळ गल्ली बार्शी),
अनंत वसंत वाघ नाळे प्लॉट बार्शी) इरफान वहीअली शेख रिंगरोड बार्शी) गुरूलिंग गंगाधर घाडगे रा पंकज नगर.बार्शी ) असे १७ जणांचे तडीपारचे प्रस्ताव पाठविले आहे. तसेच बार्शी शहरातील रेकॉर्डवरील इतरही गुन्हेगाराचे तडीपारचे प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले असल्याचे माहिती पो.नि संतोष गिरिगोसावी दिली.

या पोनि.संतोष गिरिगोसावी यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे