शशांक मनोहर यांचा आयसीसी पदाचा राजीनामा
ग्लोबल न्यूज: आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दोन वेळा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर अखेर बुधवारी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आयसीसीची आज बैठक झाली. त्यात असा निर्णय घेण्यात आला की, नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत आयसीसी उपाध्यक्ष असलेले इम्रान ख्वाजा हे उत्तराधिकारी म्हणून परिषदेचा कारभार सांभाळतील.

आयसीसी बोर्ड, कर्मचारी आणि संपूर्ण क्रिकेट परिवाराच्यावतीने मी शशांक मनोहर यांचे नेतृत्व आणि त्यांनी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून खेळासाठी दिलेले योगदान यासाठी त्यांचे आभार मानू इच्छितो. मीअशा शब्दांत आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु साहनी यांनी शशांक मनोहर यांचे आभार मानले.
२०१६ मध्ये शशांक मनोहर हे आयसीसी अध्यक्षपदी निवड झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये ते पुन्हा बिनविरोध निवडून आले. ६२ वर्षीय शशांक मनोहर हे २००८ ते २०११ या काळात बीसीसीआयचे प्रमुख होते. शशांक मनोहर हे जून महिन्यात पदावरून पायउतार होणार होते.

मात्र कोरोनामुळे आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची बैठक लांबणीवर पडल्याने मनोहर यांना पुढील दोन महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ऑगस्टपर्यंत मनोहर आयसीसीच्या अध्यक्षपदी कायम राहणार होते; पण अखेर आज त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

गांगुलीसुद्धा आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे
वेस्ट इंडीजचे माजी प्रमुख डेव्ह कॅमेरून, न्यूझीलंडचे ग्रेगोर बार्क्ले, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस नानजानी यांनीही या पदासाठी रस दाखविला आहे. सध्याच्या राज्यघटनेनुसार, गांगुलीचे राज्यातील अधिकारी म्हणून सहा वर्षांचा कार्यकाळ आणि बीसीसीआय 31 जुलै रोजी संपुष्टात येत आहे आणि आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी दावा सादर करण्यास तो पात्र आहे. आयसीसीच्या नियमांनुसार मनोहर हे आणखी दोन वर्षे त्यांचे पद सांभाळू शकतात कारण स्वतंत्र सभापतींना जास्तीत जास्त तीन मुदतीस परवानगी देण्यात आली आहे.
