शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील – छत्रपती उदयनराजे भोसले

0
96

शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील – छत्रपती उदयनराजे भोसले

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहे अशी टीका काही दिवसापूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. या टीकेनंतर राज्यतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षातून उलटसुलट विधान आले होते . मात्र यावर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले मधली भूमिका ठेवली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोणी कोणाबद्दल काय बोलावे हे ज्यांचे ते ठरवत असतो. जे कोण कोणाला बोलले ते मला विचारून नाही बोलले. ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांना विचारा. जे कुणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारुन देणार नाहीत अशा फटकळ शब्दांत उदयनराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली. माझं मत मी परखडपणे मांडत असतो असेही उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन त्याचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचारलं असता, कोरोनाचा बाऊ केला जात असल्याचे उदयनराजे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here