लवासा मध्ये कोविड सेंटर उभारा….! वाचा कोणी आणि का केली मागणी

0
96

लवासा मध्ये कोविड सेंटर उभारा….!

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या लवासा सिटीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात यावे अशा मागणीचे पत्र पुण्याचे जिल्हाधीकारी यांना लिहिले आहे. तसेच या बाबत आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीला ते मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुळशी तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वादात असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर लवासामध्ये कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी खासदार बापट यांनी केली. यासंदर्भात खासदार गिरीश बापट यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ यांना देखील पत्र पाठवत मागणी केलेली आहे.

लवासामधील रुग्णालय आणि हॉटेल कोव्हिड सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी, त्यांनी केली आहे. मात्र हॉटेल आणि रुग्णालय ताब्यात देण्यास राजकीय दबाव असू शकतो, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांना चिमटा काढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here