जेष्ठ लेखिका निर्मला मठपती यांचे हृदयविकाराने निधन

0
467

जेष्ठ लेखिका निर्मला मठपती
यांचे हृदयविकाराने निधन

सोलापूरच्या ज्येष्ठ लेखिका आणि बालसाहित्यिक निर्मला उत्तरेश्वर मठपती यांचे आज (शनिवारी)रात्री १०-३० वाजता हृदयविकाराने निधन झाले, त्या ७२ वर्षाच्या होत्या.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मनातलं आभाळ, बापडी माणसं, गुणी मुलं, काव्यरूप शामचीआई, झेट नावाचं बेट, मुलांसाठी उद्बोधक गोष्टी, वेटिंग लिस्ट, आणि संस्काराची शिदोरी यासह ३५ च्या वर त्यांची बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसेच त्यांनी कादंबरी लेखनही केलं होतं

इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारतीच्या पाठ्य पुस्तकातून ‘मुग्धा लिहू लागली’ हा धडा प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या काही पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत. निर्मला मठपती या महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या कार्यकारणी सदस्य होत्या.

त्यांच्यावर आज रविवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here