बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथे विजेचा शॉक लागून जनसेवा हायस्कूल चे मुख्याध्यापक सतीश गुंड यांचा मृत्यू. –
कासारवाडी येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथे सतीश शिवाजी गुंड रा.कासारवाडी हे आपल्या भावासोबत कामासाठी गेले होते, शेतामध्ये काम करत असताना लाईटचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. हे बार्शी शहरातील जनसेवा हायस्कूल चे मुख्याध्यापक होते.

४२२ येथील आदर्श शाळेचे संस्थापक अध्यक्ष होते. भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांचे ते मेहुणे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. विजेचा शॉक लागून अचानक झालेल्या मृत्यूमुळे कासारवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
सतीश यांचा भाऊ ऍड प्रकाश शिवाजी गुंड यांनाही विजेचा धक्का बसल्याने तेही जखमी झालेले आहे, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.