सारेगमप‘लिटिल चॅम्प्स’ कार्तिकी गायकवाड अडकणार विवाहबंधनात

0
227

ग्लोबल न्यूज – आपल्या गोड आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या कार्तिकी गायकवाड आता आयुष्याची दुसरी इनिंग खेळण्यास सज्ज झाली आहे. रोनीत भिसे या तरुणाशी तिचा साखरपुडा झाला आहे.

सारेगमप या रियालिटी शोमधून कार्तिकी गायकवाड महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. रियालिटी शो मध्ये तिने गायलेल्या ‘घागर घेऊन… घागर घेऊन..’ या गौळणीने तर तिने रसिकांच्या मनावर राज्य केले. या गाण्याला मिळालेल्या यशानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान ज्या तरुणाशी तिचा साखरपुडा झाला तो रोनित भिसे इंजिनिअर असून कार्तिकीचे बाबा कल्याण गायकवाड यांच्या मित्र परिवारातील भिसे कुटुंबीय आहेत.

कार्तिकी गायकवाड हिचा जोडीदार होणाऱ्या रोनीत भिसे यालाही संगीताची आवड आहे. तो तबला वाजवतो. तबल्याचा तीन परीक्षा देखील त्याने पास केल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here