बार्शी शहर पोलीस निरीक्षक पदी पुनश्च संतोष गिरी गोसावी तर अण्णासाहेब मांजरे तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी
बार्शी: बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बार्शी तालुका पोलीस स्टेशनला तर तर सोलापूर मुख्यालयात असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांची बार्शी शहर पोलीस स्टेशनला बदली झाली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यानी या बदल्या केल्या आहेत.

गेल्या असा महिन्यापासून बार्शी शहर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून अण्णासाहेब मांजरे हे काम पाहत होते. याच दरम्यान दौंड (नानविज) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये उपप्राचार्य म्हणून सेवा देत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये स्पेशल बदलीची ऑर्डर झाली होती. तेव्हापासूनच त्यांची बार्शी शहर पोलीस स्टेशनला बदली होणार अशी चर्चा होती.


मात्र काही सहाय्यक पोलीस निरीक्षक व फौजदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी केल्या होत्या. मात्र गिरी गोसावी यांची बदली झाली नव्हती. मात्र परवा झालेल्या कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आज रात्री उशिरा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

त्यामध्ये बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी संतोष गिरी गोसावी यांची बदलीकेली आहे. तर बार्शी शहर पोलीस स्टेशन पदी च्या पोलीस स्टेशनमध्ये असलेले अण्णासाहेब मांजरे यांची तालुका पोलीस स्टेशनला बदली केली आहे.संतोष गिरी गोसावी यांनी यापूर्वीही दोन वर्ष कोरोना च्या काळात बार्शीत उत्तम प्रकारे काम केले आहे.एक खमक्या व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्याचा पोलीस दलात नावलौकिक आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची दुसऱ्यांदा बार्शीत बदली झाली आहे.

तर तालुका पोलीस स्टेशन मध्ये ही गुन्ह्याची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी अण्णासाहेब मांजरे यांना बदलून पाठवले आहे. या ठिकाणी सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची पोस्ट असून त्या ठिकाणी महारुद्र परजने हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत . या पोलीस स्टेशनचा वाढता क्राईम रेट पाहता सरदेशपांडे यांनी प्रथमच या पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी दिला आहे.