पारनेरच्या नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण…..!
पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. याच मुद्द्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यातच विरोधी पक्षाला टीका करण्यासाठी मुद्दाच मिळाला होता. याच प्रवेशावरून विरोधकांनी राष्ट्रवादी आणि सेनेला लक्ष केले होते. मात्र या पक्षप्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. म्हणाले


पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, याचा अर्थ ते अजित पवारांनी फोडले असा होत नाही, ते पूर्णपणे स्थानिक राजकारण आहे असे राऊत म्हणले पुढे बोलताना आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे असे सुद्धा पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.
मुख्यमंत्र्यांचे सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही, तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलं आहे, ही खिचडी नाही, असे उत्तर राऊत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिलं आहे.