
मनसे सरचिटणीस देशपांडे यांचा सेनेवर जोरदार हल्ला….!
पारनेर मधील शिवसेना पक्षाच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने हा पक्ष प्रवेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जास्तच जिव्हाळी लागला आहे. या विषयी असलेली खद-खद मुख्यमंत्र्यानी बोलून सुद्धा दाखवली आहे. यावर उप-मुख्यमंत्र्यांनी आमचे नगरसेवक परत पाठवावेत असा निरोप सुद्धा अजित पवारांना पाठवलेला आहे.

नगरसेवकांच्या फोड-फोडीच्या राजकारणावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेनला जोरदार टोमणा मारला आहे. “रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः”,असे देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

मुंबई महापालिकेतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. मुंबई महापालिकेत शिवसेनेने आपली सत्ता स्थिर राखण्यासाठी ही खेळली होती. त्यावेळी बेसावध मनसेवर शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक असे खिजवण्यात आलं होते. मनसे नगरसेवकांनी फुटून शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेत शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ वाढले होते
