राजकारणातील संतांचे वैकुंठ गमन: एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

0
886

राजकारणातील संतांचे वैकुंठ गमन: एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

पंढरपूर : राजकारण, समाजकारण, सहकार, अर्थकारनासह सोलापूर जिल्ह्याला पोरके करून राजकारणातील संत सुधाकर पंत परिचारक वैकुंठाला गेले. सोमवारी रात्री साडे अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यासह सोलापूर जिल्ह्यातील एका सुशील, समृद्ध विकास पर्वाचा अंत झाला आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली आणि कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहनही केले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. यामध्येच त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवार पासून परिचारक अत्यवस्थ होते. अखेर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील. मृत्युसमयी त्यांचे 84 वर्षे इतके वय होते.

परिचारक हे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य होते. सुमारे 9 वर्षे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या भीमा , पांडुरंग सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा बँक, सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा दूध संघ, पंढरपूर अर्बन बँक, पंढरपूर नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा अनेक संस्था चालत होत्या, भरभराटीला आल्या होत्या.

काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. 2019 सालच्या विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपा कडून लढवली होती.

पुण्यातच होणार अंत्यसंस्कार

दरम्यान, शासकीय नियमानुसार परिचारक यांच्यावर पुणे येथे 25 लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तरी अशा संकटप्रसंगी त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या एका फेसबुक पोस्ट द्वारे आवाहन केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here