बार्शी : पाठीमागे न पहाता जोरात रिक्षा मागे घेतल्यामुळे वृध्द दुकानदारास धडक बसल्याची घटना यशवंतराव चव्हाण सभागृहासमोर घडली.
महात्मा गांधी शॉपिंग सेंटरचे समोरील अगरबत्ती दुकानदार साबीर हुसेन तांबोळी (वय ६७) रा.मलप्पा धनशेट्टी रोड, बार्शी हे दि. २४ एप्रिल रोजी रात्री साडेआठचे सुमारास लघुशंकेसाठी समोरील यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे रस्त्याच्या कडेने जात असताना, सभागृहासमोरील रिक्षा स्टॉपजवळ रिक्षा क्र. एमएच-१३-एएफ-२२१६ ही पाठीमागून आली आणि क्रॉस करुन पुढे गेली. तसेच चालकाने पाठीमागे न बघता रिव्हर्स गिअरमध्ये जोरात मागे घेतली. त्यामुळे तांबोळी यांना धडक बसून ते खाली पडल्याने त्यांच्या पाठीस व पायास मुकामार बसला. तरीही तो रिक्षाचालक त्यांना औषधोपचार न देताच निघून गेला.

त्यामुळे बेदरकारपणे रिक्षा चालवून धडक देऊन, मुकामार देण्यास कारणीभूत झाला म्हणून त्या रिक्षाचालकांविरुध्द साबीर तांबोळी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भा.दं.सं. १८६० कलम २७९,३३७, मोटरवाहन अधिनियम १९८८ कलम १३४(अ),१३४(ब),१७७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.