दिलासादायक: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.80 टक्क्यांवर, मृत्यूदर ही घटू लागला

0
426

ग्लोबल न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 53,601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 68 हजार 676 एवढी झाली आहे.

मागील 24 तासांत झालेल्या 871 कोरोना रुग्णांच्या मृत्यूसह देशातील एकूण मृतांची संख्या 45 हजार 257 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 68 हजार 676 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 39 हजार 929 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दिलासादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 15 लाख 83 हजार 490 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याची टक्केवारी 69.80 टक्के एवढी झाली आहे. देशातील मृतांची टक्केवारी दोन टक्क्यापेक्षा खाली घसरली असून ती सध्या 1.99 इतकी आहे. देशात सध्या 28.21 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

देशात आजवर 2 कोटी 55 लाख 81 हजार 848 कोरोनाचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 6 लाख 98 हजार 290 चाचण्या सोमवारी (दि.10) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या 10 राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे.

तसेच या राज्यांमध्ये कोरोना संसर्ग केंद्रित असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना बाधितांचा वाढता आकडा अस्वस्थतेत भर टाकत असला तरी देशाचा रिकव्हरी रेट सुधारत आहे. तर मृत्यू दर घटत आहे.

अनलॉक 3 च्या माध्यमातून देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत अनेक सणांची लगबग आहे. त्यामुळे सणांनिमित्त गर्दी करुन नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विशेष नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here