दिलासादायक: कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक; एकाच दिवसात 10 हजार 333 रुग्ण झाले बरे

0
389

राज्यात आज मोठ्या प्रमाणवार रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी गेले. एकाच दिवसात 10 हजार 333 एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.34 टक्के एवढे झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 32 हजार 277 झाली आहे. 7717 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 44 हजार 694 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

निदान झालेले 7717 नवीन रुग्ण आणि नोंद झालेले 282 मृत्यू यांचा तपशील (कंसात मृत्यूंची आकडेवारी) : मुंबई मनपा-700 (५५ मृत्यू), ठाणे- 147 (3), ठाणे मनपा-191 (6), नवी मुंबई मनपा-335 (12), कल्याण डोंबिवली मनपा-219 (16),उल्हासनगर मनपा-43 (2), भिवंडी निजामपूर मनपा-38 (1), मीरा भाईंदर मनपा-96 (5), पालघर-87, वसई-विरार मनपा-101 (2), रायगड-161 (18), पनवेल मनपा-105 (1), नाशिक-122 (1),

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नाशिक मनपा-253 (10), मालेगाव मनपा-8, अहमदनगर-177 (2), नगर मनपा-41 (1), धुळे-114 (1), धुळे मनपा-106, जळगाव-312 (12), जळगाव मनपा-57 (1), नंदूरबार-46 (1), पुणे- 340 (12), पुणे मनपा-1181 (23), पिंपरी चिंचवड मनपा-673 (12), सोलापूर-161 (21), सोलापूर मनपा-62 (4), सातारा-133 (8), कोल्हापूर-102 (3), कोल्हापूर मनपा-27 (3), सांगली-27 (4), सांगली मिरज कुपवाड मनपा-102 (1), सिंधुदूर्ग-1 (1), रत्नागिरी-63, संभाजीनगर-78 (2), संभाजीनगर मनपा-576 (4), जालना-55 (1), हिंगोली-5, परभणी-18, परभणी मनपा-10 (1), लातूर-44 (4), लातूर मनपा-53 (1), धाराशिव -15 (4), बीड-37.

मुंबईत एका दिवसात 2,467 कोरोनामुक्त

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 717 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 55 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 2,467 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 84 हजार 411 वर पोहोचली आहे.

मुंबईत 55 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 184 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर आले आहे तर रुग्ण वाढीचा दरही वाढून 69 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून आता 20 हजार 251 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 94 हजार 339 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 10,129 वर पोहोचली

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here