राज्याच्या हितासाठी पुन्हा एकत्र लढण्यास तयार, चंद्रकांतदादांचे वक्तव्य….!
भाजपा प्रदेशाध्यक्ष वांद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा राज्याच्या राजकारणात मोठे विधान केले आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. असे विधान पाटील यांनी केले आहे मात्र निवडणूक एकत्र लढणार नाही तसे सुद्धा पुढे चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविले.


आज ABP माझा या वृत्तमाध्यमाशी फोनद्वारे संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनसोबत एकत्र यायला तयार आहोत. मात्र, यापूढे कोणतीही निवडणूक एकत्रित लढणार नाही. यावर आपण ठाम आहात का असा प्रश्न त्यांना केला असता
राजकारणात कोणताही निर्णय, भूमिका ही आयुष्यभरासाठी काय असेल हे आत्ताच सांगता येत नाही. आताच्या घडीला कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत त्या मी सांगतोय असोही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.