बार्शी : टेंभूर्णी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन कोणास सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तरुणास दहा वर्षे सक्त मजूरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस.डी.अग्रवाल यांनी सुनावली.सागर दिपक जगताप (वय 22 रा.टेंभूर्णी)असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने 24 ऑक्टोबर 2018 रोजी टेंभूर्णी पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता.या खटल्यामध्ये नऊ साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये अल्पवयीन मुलगी,तिची आई,वैद्यकीय अधिकारी,तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या सरकारी वकीलांनी दोन साक्षीदार बचावासाठी तपासण्यात आले पण न्यायालयाने आरोपीच्या बचावासाठी त्या साक्षी सहाय्यभूत नाहीत संपूर्ण घटनेची कागदोपत्री नोंद झाली असल्याचे म्हटले आहे.
आरोपीने अमानुष कृत्य अल्पवयीन मुलीसमवेत केले असून फिर्यादी व इतर साक्षीदार यांची आरोपीसोबत कोणत्याही प्रकारे वैमनस्य नसल्याने खोट्या गुन्ह्यात गुंतवलेले नाही असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी करुन न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देण्यात येऊन जास्तीत- जास्त शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद,आरोपी विरुध्द असलेला सबळ पुरावा न्यायाधिश एस.डी.अग्रवाल यांनी ग्राह्य धरून आरोपी सागर जगताप यास अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड तर बाल लैंगिक कायद्यानुसार सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली व दहा हजार रुपये पिडितेस नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले दोन्ही शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेशात म्हटले आहे
सरकारतर्फे अॅड.प्रदिप बोचरे,अॅड.शामकुमार झालटे, अॅड दिनेश देशमुख यांनी काम पाहिले तर करमाळा पोलिस उपअधिक्षक विशाल हिरे,पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस नामदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले.