विनयभंग प्रकरण – मलकापूरचे एकनाथ लोमटे महाराज यांना 45 दिवसानंतर अटक

0
93

विनयभंग प्रकरण – मलकापूरचे एकनाथ लोमटे महाराज यांना 45 दिवसानंतर अटक

 उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यभर प्रसिद्ध असणारे येरमाळा जवळील मलकापूरचे स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगचा गुन्हा 28 जुलै 2022 रोजी दाखल करण्यात आला होता त्यांना कळंब पोलिसांनी 45 दिवसानंतर अटक केली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून लोमटे महाराज हे फरार होते.

महाराजांच्या दर्शनासाठी मठात आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी सदर महिला मठात दर्शनासाठी आली असता महाराजांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच मागील वेळी तू दर्शनासाठी आली होती तेव्हा तुझ्यावर बलात्कार केला होता. त्याची व्हिडिओ क्लिपही (Video Clip) माझ्याकडे असल्याची धमकी महाराजांनी दिली. तसेच ही क्लिप व्हायरल होऊ द्यायची नसेल तर तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी दिली. सदर प्रकाराला महिलेने तीव्र विरोध केला असता महाराजांनी तिच्या अंगावर हात टाकत शिवीगाळही केल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. यावेळी आरडाओरड केल्यानंतर शिष्यांची गर्दी जमा झाली, त्यानंतर महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ लोमटे महाराजांविरोधात याआधीदेखील फसवणुकीच्या तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे.

महिलेची तक्रार काय?

सदर प्रकरणी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, ती 28 जुलै रोजी दुपारच्या वेळी एकनाथ सुभाष लोमटे महाराजांच्या दर्शनासाठी मलकापूर येथील मठात गेली होती. तेथे भक्तांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे ती इमारतीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली बसली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महाराजाचा शिष्य अशोक याने सांगितले, महाराज समोरच्या रुममध्ये बसले आहेत. तुम्हाला आत बोलावलं आहे. रुममध्ये गेल्यावर , तिथे महाराज एकटेच होते. त्यावेळी त्यांनी तुला माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवावे लागतील, असे म्हटले. तसेच मागील वेळी प्रसादातून तुला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तुझ्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून तो व्हायरल करण्याची धमकीही दिली. याविरोधात आरडाओरडा केल्यानंतर महाराजांनी पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार महिलेने केली.

महाराजांविरोधात गुन्हा

महिलेने आरडाओरडा केल्यानंतर मठात भक्तांची गर्दी जमली. मात्र गर्दीतून महाराजांनी पळ काढला. या प्रकरणी कलम 354,354 अ, 341,323,504 व 506 नुसार येरमाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाराजांविरोधात आधीदेखील अनेक फुसवणुकीच्या तक्रारी आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरोधात फार कारवाया झालेल्या नाहीत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here