उस्मानाबादच्या राजशेखर पाटील यांनी माळरानावर पिकवल हिरवं सोनं ;बांबू शेतीतीतून वार्षिक पाच कोटींची उलाढाल

0
1679

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणी गावात ५० वर्षीय राजशेखर पाटील यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्याकडे पूर्वापार चालत आलेली ३० एकर कोरडवाहू जमीन होती, मात्र पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता.दुष्काळी भागासाठी बांबूच्या माध्यमातून पीकबदल अत्यंत वरदान ठरणार असल्याचे ते सांगतात. जोडीला बहुविध व फळबागांची समृद्ध शेती करून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे.

उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा आहे. साहजिकच जिल्ह्यातील निपाणी गावातील शेतीही दुष्काळाच्या झळा सोसणारी आहे. याच गावातील राजशेखर मुरलीधर पाटील यांनी परिस्थितीपुढे हार न मानता दुष्काळावर मात करायचे ठरवले. राज्यातील नेहमीची, हंगामी किंवा लोकप्रिय व्यावसायिक पिके न निवडता बांबूसारखे वेगळे पीक निवडले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आपली जमीन मध्यम-हलकी आहे हे ओळखून त्यात अत्यंत कमी पाणी व मजुरीबळ वापरून, अत्यंत कमी खर्चात बांबूची शेती व्यावसायिक पद्धतीने केली. त्यामागे संयम, धडपड, अभ्यासूवृत्ती, चिकाटी, धैर्य व बाजारपेठांचा अभ्यास असे विविध गुण त्यांच्या मदतीस धावले.

आज राजशेखर यांच्या शेतात तब्बल अडीच लाख बांबूची झाडे डौलाने उभी आहेत ही अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणायला हवी. त्याला जोड म्हणून शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी बहुविध व विशेषतः फळबागांची समृद्ध शेती राजशेखर यांनी विकसित केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यात बार्शी-लातूर मार्गावर कोलेगावपासून आत सुमारे १२ किलोमीटरवर निपाणी गाव लागते. पाणी नसणारे म्हणून निपाणी अशी गावाची ओळख सांगितली जाते. याच गावात राजशेखर यांची ५४ एकर शेती आहे. ते कृषी विषयातील पदवीधारक आहेत. साहजिकच शेतीतील तांत्रिक ज्ञानाचा आधार त्यांना आहे.

पाटील यांनी सुरवातीला पाणी आणि नंतर शेतीकडे लक्ष्य देण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी राळेगणसिद्धी या ठिकाणी जाऊन अण्णा हजारे यांच्याबरोबर पाण्याबाबत काम केले.

त्यांनी अण्णा हजारे यांच्याबरोबर २२ गावात काम केले व मोल म्हणून त्यांना महिन्याला २००० रुपये मिळत होते. परंतु अचानक वडिलांच्या आजारपणामुळे ते परत गावी आले.

यावेळी त्यांनी अगोदर गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी पाणीदूत राजेंद्र सिंह यांची मदत घ्यायची ठरविले. त्यासाठी त्यांनी गावातील १० किलोमीटर लांबीचा नाला साफ करून त्याची लांबी रुंदी अजून वाढविली.

गावातील पाण्याची स्थिती सुधारू लागल्यावर त्यांनी शेतीकडे लक्ष्य देण्याचे ठरविले. परंतु शेती करण्यासाठी पैशाची अडचण असल्याने त्यांनी जमिनीची नांगरणी न करताच त्यामध्ये आंबा, चिकू, नारळ व काही भाज्या लावल्या.

पण त्यांचे प्राण्यांपासून संरक्षण कसे करावे हा एक प्रश्न होता. त्यासाठी त्यांनी नर्सरी मधून मोफत मिळणारी बांबूची रोपे लावण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी नर्सरी मधून ४० हजार रोपे आणली व ती बांधावर लावली आणि २-३ वर्षांनी याच बांबू पासून त्यांना १० लाखाचा फायदा झाला आता लोकदेखील त्यांच्याकडे बांबू खरेदी करायला येऊ लागले आहेत.

पाटील यांनी बांबूच्या शेतीकडे लक्ष्य देण्यास सुरवात करून त्याचा अभ्यास केला. आपल्या देशामध्ये सरकारला प्रत्येक वर्षी बांबूची आयात करावी लागते याचा विचार करून त्यांनी आपल्या पूर्ण शेतीमध्ये बांबूची लागवड केली तेव्हा लोक त्यांना वेडा म्हणू लागले.

पाटील यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शेतीमधून उत्पन्न कसे निघेल याकडे लक्ष्य दिले. बांबूची शेती करताना कधीही रसायनांचा वापर केला नाही ते नैसर्गिकरित्या शेती करतात, आज त्यांची ३० एकर असलेली शेती ५४ एकर झाली आहे.

पाटील यांनी बांबूच्या २०० प्रकारच्या जाती शेतात लावल्या आहेत आणि एकदा याची लागवड झाली की २-३ वर्षानंतर तुमचे उत्पादन सुरु होते. एकदा लावलेले बांबूचे झाड तुम्हाला ७ वर्ष उत्पादन देऊ शकते.

एका झाडापासून १०- २०० बांबू मिळू शकतात आणि एका बांबूची किंमत २० रुपयापासून ते १०० रुपये एवढी मिळू शकते. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले असून त्यांची राष्ट्रीय बांबू मिशनच्या ऍडव्हायजर पदी नियुक्ती झाली आहे.

पाटील आता शेतकऱ्यांना बांबू शेती करण्याबाबत प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी स्वतःची नर्सरी चालू केली. पाटील सांगतात की नर्सरी व बांबूच्या शेतीमधुन वार्षिक ५ करोड एवढा टर्नओव्हर आहे.

बांबूची शेती
साधारण २००५ च्या सुमारास बांबूची सुमारे ४० हजार रोपे शेताच्या बांधांवर लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तापमानाला हे पीक अनुकूल प्रतिसादही देऊ लागले. आजूबाजूचे लोक बांबूची मागणी करू लागले. साधारण २०१० मध्ये बांधावरच्या या बांबूने लाखाचे उत्पन्न दिले तेव्हा बांबूच्या शेतीचे गणित कळले. मग राजशेखर यांनी मागे वळून पाहिले नाही.

विकसित केलेली बांबू शेती

निसर्ग शेतीचा ध्यास घेत बांबू शेती विकसित केली. जपानमधील कायटो बांबूच्या शेतीचा प्रभाव आहे.
सर्वत्र घनदाट पद्धतीने बांबूचे वन विकसित.
भारतात आढळणाऱ्या बांबूच्या १६० प्रकारांपैकी १० ते २० प्रकार राजशेखर यांच्या बनात पाहण्यास मिळतात.
त्रिपुरा, मिझोराम, कर्नाटक आदी भागांतील तसेच देशी व परदेशी प्रकारांचा संग्रह.

मानवेल, मानगा, मेसकाठी, कटांगा, कनक, ब्रॅंडीसी, टुल्डा, ऑलीवेरी, व्हल्गॅरीस, मल्टिपेल्क्‍स अशी त्यांची विविधता. सध्या बांबूची एकूण अडीच लाख झाडे. हे क्षेत्र सुमारे ३० एकरांचे असले तरी झाडे विखुरली असल्याने ५४ एकरांपर्यंतही ते व्यापलेले.
यातील ४० हजार झाडे सतरा वर्षांपूर्वीची तर उर्वरित दोन ते पाच वर्षे वयाची.

मध्यम-हलक्‍या प्रतीच्या जमिनीत साडेचार बाय साडेचार फूट या अतिसघन पद्धतीने लागवड.
संपूर्ण लागवड ठिबकवर.
लागवडीनंतर पहिली तीन वर्षे उत्पादनासाठी प्रतीक्षा.
त्यानंतर प्रत्येक दीड वर्षाने उत्पादन.

एकरी सुमारे दोन हजार झाडे बसतात. प्रत्येक झाड दीड वर्षाला सुमारे चार काठी किंवा त्याहून अधिक उत्पादन देऊ शकते. म्हणजे एकरी सुमारे आठ हजार काठ्या उत्पादन मिळू शकते.

एखाद्या वर्षी पाणी न मिळाल्यास झाड सुप्तावस्थेत जाते. मात्र जळून जात नाही. पाणी दिल्यास
पुन्हा वाढीची जोम पकडते.
बांबू लागवडीसाठी शासकीय परवानगी, वाहतूक परवाना यांची गरज नाही.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here