भाजपाला घराचा आहेर, राम मंदिरासाठी मोदींचे नाही राजीव गांधींचे योगदान
अयोध्या येथे ५ ऑगस्ट रोजी राम जन्मभूमी पूजनाचा सोहळा पार पडणार आहे. याची जय्यत तयारी अयोध्येत सुरु झालेली आहे. मात्र राम जन्मभूमी प्रकरणात भाजपाच्या बड्या नेत्याच्या वक्तव्य करून भाजपाला घराचा आहेर मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतेही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचं झाले तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव घ्यावं लागेल, अशा शब्दांत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. टीव्ही 9 भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना हे वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

चर्चेदरम्यान, त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणखी कोणाकोणाला निमंत्रण द्यायला हवे होते, ज्यांना देण्यात आलेलं नाही. यावर राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंही योगदान नाही.
यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणं सरकारच्यावतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळं हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय.