मनसेच्या शहराध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड

0
197

मनसेच्या शहराध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड

बार्शी । येथील राजेंद्र भगवान गायकवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या स्वाक्षरीने व उपस्थितीत करकंभ येथील बैठकीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, शाम कदम, दत्ता कांबळे, बंडू टोणपे, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
याप्रसंगी बोलतांना राजेंद्र गायकवाड म्हणाले, बार्शी तालुक्यात पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत असलेला तरूण वर्ग मोठ्या संख्येने आहे. यापूर्वीही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी मोठे काम केले असून पक्षाच्या ध्येय धोरणांनुसार सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी आपण सज्ज आहोत. 

यापूर्वी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम केले आहे, यात महिला बचत गट तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतांना केलेल्या आंदोलने व मोर्चे काढल्याने वििवध गुन्हेही दाखल झाले आहेत. कोणावर अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठी आपला पूर्णवेळ देण्यासाठी तयार आहोत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here