प्राप्तिकर विभागाचे राजस्थान, दिल्ली व मुंबईत विविध ठिकाणी छापे
प्राप्तिकर विभागाच्या तीन पथकांनी सोमवारी (दि.१३) शोध आणि तपासणी मोहिमा राबवल्या. मुंबईत ९ ठिकाणी, दिल्लीत ८ ठिकाणी आणि राजस्थानच्या जयपूर इथे २० तर कोटा इथे ६ ठिकाणी या मोहिमा राबवण्यात आल्या.

या मोहिमा ज्या कंपन्यांच्या कार्यालयांवर राबवण्यात आल्या, त्यापैकी एक कंपनी हॉटेल, जलविद्युत, धातू आणि वाहन उद्योग अशा विविध उद्योगांमध्ये आहे. या सर्व उद्योगांमधून मिळालेली बेहिशेबी मालमत्ता या कंपनीने बांधकाम उद्योग क्षेत्रात गुंतवली असल्याचा संशय आहे.
दुसरी कंपनी चांदी/सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्राचीन वस्तूंच्या व्यवसायात असून त्यांच्या इंग्लंड, अमेरिका अशा विविध देशांमध्ये सहकारी कंपन्या आहेत.

तसेच या देशांमध्ये त्यांच्या इतर मालमत्ता आणि बँक खातीही आहेत. या कंपनीवर मुख्य आरोप हा आहे, की त्यांच्या चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायाचा एक महत्त्वपूर्ण भाग, म्हणजे त्यांचा बेनामी व्यवसाय आहे.

तिसरी कंपनी हॉटेल व्यावसायिक आहे. या कंपनीच्या उत्पन्नाचे स्त्रोत तपासण्यासाठी ही मोहीम राबवली गेली.
या कंपन्या सोन्या-चांदीच्या बाजारात रोखीने व्यवहार करत असल्याचे आणि अनेक मालमत्ता रोखीने विकत घेतल्या असल्याचे ठोस कागदोपत्री पुरावे, जसे की, काही कागदपत्रे, नोंदवह्या, डिजिटल डेटा या तपासणीत सापडला आहे. पुढचा तपास सुरु आहे.