पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर होम क्वारंटाईन
ग्लोबल न्यूज : दिवसेदिवस पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी पुण्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दीपक म्हैसेकर स्वत: होम क्वारंटाईन झाले आहेत.
डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरने कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दीपक म्हैसेकर यांनी खबरदारी म्हणून घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.