सभापती व्यंकय्या नायडू आणि भाजपा विरोधात जनतेमध्ये रोष….!
राज्यसभा सदस्य खासदार म्हणून शपथविधी घेत असताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ” जय भवानी जय शिवाजी ” अशा घोषणा दिल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी ” हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे, हे रेकॉर्डवरही घेतलं जाणार नाही. नवनिर्वाचित सदस्य उदयनराजे यांनी यापुढे दक्षता घ्यावी ” अशा प्रकारची सूचना दिल्याचे दिसून आले.


मात्र गेल्या काही कालावधीत बऱ्याच लोकप्रतिनिधींनी जय श्रीराम, राधे राधे तसेच अल्लाहू अकबर, जय भीम अशा अनेक धार्मिक घोषणा दिलेल्या पाहावयास मिळाल्या होत्या. मात्र त्यावेळेस अशी कोणत्याही प्रकारची समज निर्वाचित खासदारांना देण्यात आली नव्हती मग आताच का? असा प्रश्न शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे. यावर सध्या सोशल मीडियावर व्यंकय्या नायडू आणि भाजपा विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सभापती व्यंकय्या नायडू हे भाजप पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाशी निगडित आहेत त्यांना इतर घोषणा चालतात मात्र ” जय भवानी जय शिवाजी ” या घोषणेचा तिटकारा का वाटतो असा प्रश्न आता नेटकऱ्यांनी उपस्थित करत भाजपाला लक्ष केले आहे.