नशीब या गोष्टीवर आज १०० पैकी ८० टक्के लोक विश्वास ठेवतात नशिबातच नव्हते, नशीब साथ देत नाही अशा गोष्टी करत पुन्हा प्रयत्न करण्याच्या पळवाटा ते शोधात असतात .

मात्र या नशिबाला एक गोष्ट तो जोडायला नक्की विसरतो ती म्हणजे प्रयत्न, आज एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो नशिबावर सोडून पुन्हा त्या गोष्टीचा विचार करण्याचा फंद्यात पडत नाही.

” MPSC देणारा एखादा विद्यार्थी पहिल्याच परीक्षेत यश संपादन करतो मात्र काहींना दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा प्रयत्न करावा लागतो ” आता या गोष्टी नशिबाच्या आहेत का? तर नाही.
आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी नशिबावर अवलंबून नसतात त्याला प्रयत्नाची साथ लागते म्हणून आज भारतातली २० टक्के लोक टाटा, बिर्ला आणि अंबानी बनतात कारण ते नशिबापेक्षा प्रयत्नावर जास्त विश्वास ठेवतात व ८० टक्के लोक त्यांचा हाताखाली काम करतात कारण ते नशिबावर विश्वास ठेवतात म्हणूनच “Best of लक” म्हणण्यापेक्षा “प्रयत्नार्थी परमेश्वर” म्हणा.