
सुरेशकुमार घाडगे
परंडा – शहरातील गोपीनाथराव मुंडे नगर पालिका सभागृहात कोरोना रॅपिड टेस्ट करताना योग्य ती काळजी घेतली जात नाही. संबधीतावर योग्य ती कार्यवाही करावी . अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे अॅड. पवन सुदिप मोरे यांनी सोमवार ( दि.१७ ) निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या पालिकेच्या गोपीनाथराव मुंडे सभागृहात परंडा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची रॅपीड टेस्ट घेण्याचे सुरू आहे. या घेतल्या जात असलेल्या रॅपीड टेस्ट वेळी पालिका प्रशासन योग्य ती काळजी घेत नाहीत टेस्ट करताना येणाऱ्या सर्व नागरिकांना सॅनिटायझर न करता तपासणी केली जात आहे
.व तपासणी करताना पीपीई किट चा वापर केला जात नाही. सतत वापरात येणाऱ्या त्याच खुर्चीमुळे अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.शहरवासीयांना आपला जीव धोक्यात घालूनच रॅपीड टेस्ट करून घ्यावी लागत आहे त्यामुळे संबधीत जबाबदार आधिकारी व व्यकतीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा योग्य ती काळजी न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात अंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हंटले आहे.

दिलेल्या निवेदनावर अॅड. पवन मोरे , दिनेश गरड, विश्वजीत पिंगळे, शिवम पेडगावकर, सुमित काशिद आंदीच्या सह्या आहेत.
