आशादायक:बार्शी तालुक्यात उरले फक्त १९३ कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण ; 1672 पैकी 1417 जण झाले बरे
बार्शी :बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडणाऱ्यापेक्षा रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे आजवर बार्शी तालुक्यात १६७२ बाधित रुग्ण संख्या होती मात्र त्यापैकी १४१७ जणांना डिस्चार्ज दिल्याने आता फक्त तालुक्यात १९३ बाधित रुग्ण उरले असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली .

गेल्या काही महिन्यात बार्शी शहर तालुक्यात कोरोना बाधितांचे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती मात्र प्रशासनाने केलेले उपाययोजना व रुग्णांची तपासणी उपचार व केलेल्या लॉकडॉनचा सकारात्मक परिणाम दिसु लागला आहे . त्यामुळे कोरोना बाधित संख्येमध्ये मोठी घट आली आहे . जरी सध्या कोरोना बाधित रुग्ण सापडत असले तरी अधिक पटीने बाधित रुग्ण उपचारानंतर घरी सोडले जात आहेत.
बार्शी तालुक्यात मागील काही दिवसात अॅन्टीजन टेस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात येत असुन यात बधित रुग्ण सापडल्याने पुढे संसर्ग वाढण्याचा धोकाही कमी होत आहे आजवर तालुक्यात सर्वाधिक अशा १०५०७ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट झाल्या आहे .जिल्ह्याचा 67 टक्के बाधित रुग्ण बरे झाले आहेत तर बार्शी तालुक्याचा सुमारे 80 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तसेच बार्शी तालुक्यात आजवर 70 रुग्ण दगावले असून याचे प्रमाण ३.५ टक्के आहे . सध्या शहर व तालुक्यातील कंटेनमेंट झोनच्या संख्येमध्ये मोठी घट आली आहे एकूण ३९४ कंटेनमेंट पैकी २१८ कंटेनमेंट झोन सुरू असल्याचे म्हणाले.

तसेच उपचारानंतर दवाखान्याचे बिला संदर्भातील कोणाच्या काही तक्रारी असतील त्यासाठी बिलाचे ऑडीट करण्यासाठी आठ अधिकाऱ्यांचं टास्क फोर्स बनवला आहे त्यांच्याकडून अतिरिक्त बिलाची आकारणी झाली आहे का याची तपासणी होत आहे.ज्या बिलासंदर्भात कोणाला काही शंका असेल त्यांनी या संबधित अधिकाऱ्यांकडे तक्रार कराव्यात

शहरातील डॉ अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल, सोमाणी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल तसेच जगदाळे मामा हॉस्पिटल यामध्ये कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत मात्र आज सकाळी जगदाळे मामा हॉस्पिटल ला भेट देऊन काही सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत .

तसेच विलगीकरण कक्षामधून काही बाधित रुग्ण पळून जाऊ नये यासाठी तेथे पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली आहे .
त्यामुळे बार्शी शहर व तालुक्यातील कोरोणाची परिस्थिती नियंत्रणात आहे . मात्र अजून येथील कोरोना नष्ट झालेला नाही तरी नागरीकांनी मास्कचा वापर करावा यासह कोरोना संदर्भात शासनाने दिलेले नियम पाळावे. कोरोना अटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेचे काम चांगले असून यामध्ये सर्व प्रशासन, वैदयकिय क्षेत्रातील सर्व जण आशावर्कर यांना श्रेय जाते.
