सोलापूर जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू ; वाचा काय आहेत मार्गदर्शक सूचना

0
369

सोलापूर जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू ; वाचा काय आहेत मार्गदर्शक सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर, दि. 30 : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून 31 जुलै 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले. हे आदेश नवीन सुधारीत सूचनेनुसार पोलीस आयुक्तालय हद्द वगळून लागू करण्यात आले आहेत.

नवीन सुधारित सुचना खालीलप्रमाणे

  1. 65 वर्षे वयावरील व्यक्ती, गंभीर आजारी असलेले रुग्ण, गरोदर स्त्रिया तसेच 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच रहावे. त्यांना अत्यावश्यक कामासाठी व आरोग्यविषयक कारणासाठी निर्देशाचे पालन करणे आवश्यक राहील.
  2. प्रतिबंधीत सांसर्गीक क्षेत्रामध्ये अत्यावश्यक बाबी वगळता निर्बंध कडक राहतील.
  3. सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीला अटी/शर्थीनुसार चालू असतील. यामध्ये दुचाकी वाहन (मोटरसायकल) केवळ चालक, तीनचाकी वाहन 1+ 2, चारचाकी वाहन 1+ 2.
  4. जिल्हाअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50% इतक्या मर्यादेपर्यंत आणि सुरक्षित शारिरीक अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून सुरु राहतील.
  5. आंतरजिल्हा हालचाल/ये-जा यांचे नियमन केले जाईल.
  6. सर्व बिगर अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने/मार्केट ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उघडी राहतील तथापि सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक राहील.
  7. लग्न समारंभाचे आयोजन खुल्या जागा, लॉन्स, विनावातानूकुलीत मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरामध्ये करण्यास या कार्यालयाचे दि.24/06/2020 रोजीचे नमूद आदेशानुसार करण्यास परवानगी असेल.
  8. क्रिडा संकूल/स्टेडियमचा बाह्य भाग आणि इतर खुल्या सार्वजनिक जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. प्रेक्षक व सांघिक क्रिडा प्रकार करण्यास परवानगी असणार नाही. बंदिस्त स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या एखाद्या भागात शारिरीक हालचाली अथवा व्यायाम करण्यास परवानगी असणार नाही. सर्व व्यायाम आणि इतर उपक्रम सुरक्षित अंतराचे निकष पाळून करावेत.
  9. वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण (घरपोच वितरण) यांना परवानगी आहे.
  10. शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/ महाविद्यालये/शाळा) यांची कार्यालये/कर्मचारी केवळ ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करण्यासह शिक्षणाव्यतिरिक्त (नॉन टीचिंग) उद्देशाने कामकाज करण्यास परवानगी आहे.
  11. राज्य शासनाने ज्या केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना परवानगी दिलेली आहे. त्यांना यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीवर चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
  12. यापूर्वी देण्यात आलेल्या विशिष्ट/ सामान्य आदेशानुसार परवानगी व मान्यता देण्यात आलेले उपक्रम चालू राहतील.
  13. सर्व सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी व प्रवासामध्ये चेहऱ्यावर मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक आहे.
    14.सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी एकमेकांमध्ये किमान सहा फूट (2 गज की दूरी) अंतर ठेवावे.
  14. दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर असल्याची खात्री करावी. तसेच पाचपेक्षा अधिक ग्राहकांना एकावेळी दुकानात येण्यास परवानगी देऊ नये.
  15. मोठया सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल. विवाहस्थळी जास्तीत जास्त 50 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी आहे. अंतयात्रा/ अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जास्तीत जास्त 50 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी असेल.
  16. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असेल. थुंकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
  17. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा व तंबाखू सेवनास कडक निर्बंध असतील.
  18. जास्तीत जास्त आस्थापनांनी कर्मचाऱ्याकडून घरातून काम करुन घ्यावे. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, मार्केट, तसेच औद्योगिक व वाणिज्यीक आस्थापनामध्ये कामाच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे.
  19. कामाच्या प्रवेशाच्या ठिकाणी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग, हॅन्डवॉश, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा.
  20. कामाचे ठिकाण व शिÈट बदलताना कर्मचारी यांच्यासाठी असणाऱ्या एकत्र सुविधांचे ठिकाणी व सर्व मानवी संपर्क येण्याच्या ठिकाणी दरवाजे, हॅन्डल, वारंवार स्वच्छ व सॅनिटाईझ करण्यात यावे.
  21. कामाच्या ठिकाणी कामगारांमध्ये योग्य ते सुरक्षित अंतर असेल तसेच शिफटदरम्यान पुरेसे वेळेचे व सुरक्षित अंतर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भोजन कालावधीमध्ये शिथिलता ठेवावी

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here