बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा.बी टी गुंड सेवानिवृत्त

0
311

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथील शारीरिक शिक्षण विभागाचे सहयोगी प्राध्यापक श्री भारत  तुकाराम गुंड हे आपल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ  शिक्षक सेवेतून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. 

यानिमित्ताने संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा डॉ बी वाय यादव, जनरल सेक्रेटरी मा श्री विष्णू पाटील, विश्वस्त मा प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे, बी पी एड विभागप्रमुख डॉ सुरेश लांडगे, एम पी एड विभागप्रमुख प्रा जी एस फडतरे, प्रा बी टी गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

प्रा बी टी गुंड  यांनी बी पी एड व एम पी एड विभागाकडे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्य केले. वक्तशीरपणा व संयमी स्वभाव ही त्यांची विशेष गुणवैशिष्ट्ये आहेत. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून सरांचे कार्य उल्लेखनीय आहे.  म्हणूनच महाराष्ट्र राज्य क्रीडा महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून सर्वानी राष्ट्रीय एकतेची प्रतिज्ञा घेतली.   डॉ आर ए फुरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ ए जी कांबळे व डॉ व्ही पी शिखरे यांनी प्रा गुंड सर यांच्या कार्यकर्तृत्वावर मनोगते व्यक्त केली.  प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे यांनी उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून प्रा गुंड सर यांचा उल्लेख केला . तसेच विनम्रता व आदरभाव या गुणवैशिष्ट्यामुळेच ते आपल्या जीवनात यशस्वी झाले असे सांगितले.

प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी प्रा गुंड सरांच्या उत्कृष्ठ कार्यशैलीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक क्रीडा शिक्षक व खेळाडू नावलौकिक प्राप्त करत आहेत. प्रवेश प्रक्रिया, क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील विविध समितीतील सरांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे.  ते नेहमी प्रसिध्दी पासून दूर राहत आलेले आहेत. सर्वांशी सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यात ते यशस्वी झाले आहेत असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात डॉ बी वाय यादव यांनी प्रा गुंड सरांना संस्थेच्या वतीने भावी आयुष्यासाठी आरोग्यमय शुभेच्छा दिल्या.  प्रा गुंड यांच्या उत्कृष्ठ कार्याचा सविस्तर आढावा घेतला. खेळाडूंना प्रेरणादायी असलेले व्यक्तिमत्त्व आज सेवानिवृत्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले. येथून पुढे देखील  सरांनी संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे असे सांगितले. तसेच कोरोनाच्या काळात सर्वांनी काळजी घ्यावी  याविषयी सूचना केल्या. जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रामा सेंटर उभारणीसाठी सर्वांनी सढळ हाताने मदत करावी असे याप्रसंगी आवाहन केले.   प्रा सौ स्मिता सुरवसे यांनी आभारप्रदर्शन केले. प्रा पी पी नरळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास  प्राध्यापक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here