सामनाच्या रोखठोक मध्ये हे छापून दाखवा,चंद्रकांत पाटलांचे राऊतांना आव्हान
शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारच्या रोखठोक सदरातून विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता. ठाकरे सरकार ऑक्टोबरपर्यंत पाडण्याच्या बाहेर पैजा लागल्या आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर राजकारण करत असल्याच्या आरोप केला होता. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

एकामागून एक ट्विट करत सामनाच्या रोखठोक सदरात मी लिहिलेले मुद्दे छापा असं म्हणतन चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.
सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील ‘रोखठोक’ साठी माझे प्रस्ताव….

नंबर १ – “मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली…… ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे…….तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द……. मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं….हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे….”
नंबर २ – “पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला……सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते………. ……..पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत……………… मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही…………….. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…..”
नंबर ३. “ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे………….. यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही…………… मात्र कोरोनाचा मृत्युदर वाढत चालला आहे…… …दिवसाला ६ हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत…………. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”
नंबर ४. “राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याचे ढोल बडवले…………. अजूनही अंमलबजावणी नाही…………… शेतकऱ्यांना वाईट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत…….. ………..खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही……………… हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…..”