प्रतीक नांदगावकर यांचा सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम…

0
374

प्रतीक नांदगावकर यांचा सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम…

ग्लोबल न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त काळाचौकी विभागात “रक्तदान शिबिराचे”आयोजन करण्यात आले होते . सध्या सगळीकडेच रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहें. हीच गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई युवक सचिव प्रतीक नांदगावकर यांनी सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुंबईतील काळाचौकी या परिसरात सोशल डिस्टनसिन्गचे नियम पाळत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच, प्रतीक नांदगावकर हे लॉकडाउन झाल्यापासून अनेक गरजूपर्यंत सतत मदत पोहचविण्याच काम करीत आहें.

सदर कार्यक्रमात राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.संजय बनसोडे,विभागीय आमदार अजय चौधरी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मुंबई अध्यक्ष निलेश भोसले आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here