प्रशांत कानगुडे यांचे ‘एमपीएससी’त यश; सहायक कक्ष अधिकारी म्हणून झाली निवड
बार्शी : महाराष्ट्र लोकसेवाआयोगांतर्गत ६ मार्च रोजी घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत सहायक कक्ष अधिकारी स्पर्धा परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील सौंदरे
येथील रहिवासी प्रशांत कानगुडे यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागातून यश संपादन केले.


सामान्य कुटुंबातील कानगुडे यांनी तालुक्याचे नाव उंचावत
आपल्या जिद्दीच्या जोरावर यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ९३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये मंत्रालयीन विभागातील ८३, तर लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील १० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली
होती. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा