चोरट्यांनी लंपास केलेला ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्या असा पंधरा लाखाचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत
बार्शी तालुका पोलीसांची कामगिरी
बार्शी/प्रतिनिधी:
चालकाच्या हात-पाय बांधून त्याला शेतामध्ये फेकून देत ट्रॅक्टर पळवून नेला होता अशी फिर्याद संजय राठोड (वय 20)बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल दाखल झाली होती. बार्शी येरमाळा रोडवर पाथरी गावानजीक अकाउंट ट्रॅक्टर चालकास आडवं त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्या असा पंधरा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास करीत पलायन केले होते.


या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे, हवालदार राजेंद्र मरगळे, अमोल माने, दशरथ बोबडे, विशाल भराटे यांचे पथक तपासणी साठी रवाना झाले. पोलिस पथक रात्रभर गस्त घालत असताना पिंपळवाडीच्या शिवारात ट्रॅक्टर आला असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे, दरोडेखोराकडून पळविण्यात आलेल्या ट्रॅक्टरची दोन नवीन टायर बदलण्यात आली असून जुने टायर टाकण्यात आली होती तर बॅटरी चोरट्यांनी लंपास केली आहे.
बार्शी: पाथरी गावाजवळ दरोडा नवीन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १५ लाखांचा ऐवज लंपास
मंगळवारी रात्री ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन गावाकडे निघाल्यावर ट्रॅक्टर चालकास आडवं त्यास मारहाण करत, हात पाय बांधून अंगावरील कपडे काढून दोन ट्रॉली, हेड, मोबाईल हँडसेट रोख रक्कम असा पंधरा लाख रुपये किमतीचा दरोडेखोर घेऊन गेले होते. अशी फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे हे करत आहेत.