अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह बार्शीत नवरदेवा सह सहा जणांवर पोलिसांनी केली कारवाई

0
348

अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह  बार्शीत नवरदेवा सह सहा जणांवर पोलिसांनी केली कारवाई

बार्शी: दिनांक 22.4.2021 रोजी बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयात बालविवाह प्रकरणी नवरदेव सह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जैन मंदिराजवळ एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती, दुपारी गस्त घालतअल्पवयीन मुलीसोबत बालविवाह  बार्शीत नवरदेवा सह सहा जणांवर पोलिसांनी केली कारवाई असताना पोलिस पथकाला मिळाली असता, पोलिसांचे पथक घरासमोरील लग्नासाठी घातलेल्या मंडपात म्हणजेच विवेक आडसूळ वय 23 राहणार देशमुख प्लॉट बार्शी येथे पोहोचले असता प्रथम चौकशी समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

पीएसआय प्रेम केदार, एपीआय  ज्ञानेश्वर उदार यांनी अधिक चौकशी केली असता विवेक अडसूळ यांचा विवाह सकाळीच एका सोलापुरातील अल्पवयीन मुलीसोबत झाले असल्याचे समजले. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9,10,11 प्रमाणे नवरदेवा सह सहा जणांविरुद्ध बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास बार्शी पोलिस करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here