चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

0
190

बार्शी : चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या एका तरूणाला बार्शी तालुका पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. अविनाश प्रकाश अंधारे, वय -20वर्षे मुळ रा. माणकेश्वर ता. भुम जि. उस्मानाबाद सध्या रा. बार्शी असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

राहुल बोंदर, वय26वर्षे, यांनी फिर्याद दाखल केली आहे.पोलिस पथक रात्रगस्तीदरम्यान गाताचीवाडी शिवारातुन जाणा-या बार्शी बायपास रोडवर आले असता तेथे एक इसम अंधारात दबा धरून बसलेला दिसला त्यास पोलिसांनी जागीच पकडले व त्यास नाव गाव विचारले असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला.संबंधीत तरुणास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता. त्याने त्याचे नाव-अविनाश प्रकाश अंधारे, वय -20वर्षे मुळ रा. माणकेश्वर ता. भुम जि. उस्मानाबाद सध्या रा. बार्शी असे असल्याचे सांगितले.

पकडलेल्या इसमाची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी स्क्रुड्रायव्हर, बँटरी मिळुन आली. त्यामुळे सदरचा इसम हा आपले अस्तित्व अंधारात लपवुन मालाविषयी गुन्हा करण्याच्या इराद्याने सदर ठिकाणी मिळुन आला आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here