बार्शी : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीस विष पाजल्याची घटना येथील तळेवाडी भागात घडली.
याबाबत मीना शंकर मोरे (वय ४२) रा. तळेवाडी, सुभाषनगर, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माझे लग्न पंचेवीस वर्षापूर्वी शंकर वैजीनाथ मोरे यांचेशी झाले असून पतीला दारु पिण्याचे व्यसन आहे. माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळी मारहाण करत असतात.
दि. २८ एप्रिल रोजी मी सकाळी सहा वाजता अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास जाऊन सायंकाळी सहा वाजता घरी परतले. तेव्हा दिवसभर तू कुठे होतीस म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन मला शिवीगाळी करुन भाजी कापण्याचे विळीने मारु लागल्याने मी तानाजी मोरे यांचे घरी गेले व तेथेच मुक्काम केला.

दि. २९ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घरी आले. पुन्हा मारहाण केल्याने घराबाहेर येऊन रस्त्यावर थांबले. दुपारी बाराचे सुमारास घरी गेल्यावर पतीने घरात ठेवलेली शेतात फवारण्याची औषधाची बाटली घेऊन मला खाली पाडून माझे अंगावर बसून माझ्या तोंडात बाटली कोंबून मला विषारी औषध पाजले. मला उलट्या होऊन चक्कर येऊन मी पडले.
मी शुध्दीवर आले तेव्हा मला माझा भाऊ नागनाथ जाधव याचेकडून समजले की, माझ्यावर जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.