पॉक्सो विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघे निर्दोष मुक्त

0
115

बार्शी : पॉक्सो विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी कोर्टी ता. करमाळा येथील दोघांची येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. छगन नामदेव बुधवते व गणेश छगन बुधवते अशी निर्दोष मुक्तता झालेल्या दोघांची नावे आहेत.
दि. २८ जून २०१९ रोजी सायंकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सदरची घटना कोर्टी तालुका करमाळा येथे घडली होती. यातील आरोपींनी दोन युवतींची छेड काढून तदनंतर त्यांचे घरी जाऊन त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केल्याबाबतची फिर्याद करमाळा पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.
याप्रकरणी गणेश छगन बुधवते, छगन नामदेव बुधवते व अन्य एक अल्पवयीन यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान पीडित युवती तसेच इतर साक्षीदार व तपास अधिकारी यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी अॅड. निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तिवादात आरोपींचा विरोधात कोणताही सबळ पुरावा नसून, आरोपींनी असा कोणताही गुन्हा केलेला नाही तसेच सबळ पुरावा नसल्याकारणाने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असा युक्तिवाद केला.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी छगन नामदेव बुधवते व गणेश छगन बुधवते यांची सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॅड. निखिल पाटील, अॅड. विक्रम सातव व अॅड. दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here