ओपन स्पेस जनजागृती अभियान ला प्लॉट धारकांचा प्रतिसाद

0
13

ओपन स्पेस जनजागृती अभियान ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बार्शी दि
बार्शी शहरातील लेआऊट आणि गुंठेवारी मधील ओपन स्पेस (खुले प्लॉट ) बाबत प्लॉटधारकात जनजागृती होण्याच्या उद्देशाने जाहीर केलेले अभियान १सप्टेंबर २०२१ पासुन सुरू झाले .ओपन स्पेस जनजागृती अभियान चा शुभारंभ माऊली नगर देशमुख प्लॉट कासारवाडी रोड येथुन करण्यात आला .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


यावेळी प्लॉट धारक राजाभाऊ सुरवसे , सचिन मोरे ,अविनाश शिंदे ,इमाम मुलाणी ,सोमनाथ शिंदे ,रमेश दराडे ,बप्पा घाणेगावकर ,शिवाजी खरवणे ,नितीन वाघमारे ,बारबोले मेजर ,लोखंडे ,मेजर पोकळे ,सुरज शिंदे ,अभिजित पाठक ,जीवन लुगडे ,महेश बाभळे ,लालासाहेब शेवाळे, काळे उपस्थित होते .
स्वागत प्रास्ताविक करताना सुरवसे यांनी या अभियानाची गरज स्पष्ट करीत या अभियानामुळे ओपन स्पेस खऱ्या अर्थाने वाचले आहेत प्लॉट धारक आपल्या हक्काप्रति जागृत होत आहेत हेच या अभियानाचे वैशिष्ट्य आहे

यावेळी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे म्हणाले की , शहराचा दिवसेंदिवस वाढता विस्तार,झालेले  होणारे लेआऊट ,गुंठेवारी या पार्श्वभूमीवर प्लॉटधारकाच्या हक्काचे असणारे ओपन स्पेस विक्री होणे, गायब होणे अश्या स्वरूपाच्या तक्रारी वाढत होत्या याबाबत माजी मंत्री दिलीप सोपल महा हौसिंग चे माजी अध्यक्ष राजेंद्र मिरगणे ,शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉटधारक नागरिकांत जागृती करून ओपन स्पेस बाबत असणारी कायदेशीर बाजु सांगणे . प्लॉटधारकाची सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन मदत करणे आणि सोसायटी स्थापन झाल्यावर नगरपालिका कडे हस्तांतरित केलेले ओपन स्पेस सोसायटी च्या नावे हस्तांतरित करून देणे त्याबाबत माहिती देणे, प्लॉटधारकासमवेत पाठपुरावा करणे असे या अभियानाचे स्वरूप आहे .


एम आर टी पी ऍक्ट मध्ये व गुंठेवारी अधिनियमात ओपन स्पेस बाबत असलेल्या तरतुदी अनेक प्लॉटधारक नागरिकांना माहीत नसल्याने तसेच प्लॉटधारकाच्या एकजुटी अभावी ओपन स्पेस चा गैरवापर होतो आहे .तो रोखणे ही काळाची गरज आहे म्हणुन हे अभियान हाती घेण्यात येत आहे . ज्या ज्या ठिकाणी ले आउट ,गुंठेवारी झालेली आहे तेथील प्लॉटधारकाना एकत्रित करून चर्चा विचारविनिमय करून प्लॉटधारकाच्या हक्काचे ओपन स्पेस प्लॉटधारकाना मिळवून देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असणार आहे . ओपन स्पेस प्लॉटधारकाच्या सोसायटी शिवाय कोणालाही देत येत नाही नगरपालिका त्या जागेची कायदेशीर मालक नसते कायद्याच्या तरतुदी प्रमाणे फक्त सोसायटी होईपर्यंत नगरपालिका कडे या ओपन स्पेस जागेचे हस्तांतरण झालेले असते .


ओपन स्पेस संदर्भात कायदेशीर माहिती देणे ,प्लॉटधारकाची सोसायटी स्थापन करणे ,ओपन स्पेस प्लॉटधारकाना मिळवून देणे असे या अभियानाचे स्वरूप असणार आहे . मिळालेल्या ओपन स्पेस  मध्ये लोकसहभागातून वृक्षसंवर्धन ,लहान मुलांना खेळणी ,दानशूर लोकांच्या सहकार्याने कायदेशीर दृष्ट्या अनुदेय असलेले १० टक्के सामाजिक उपक्रमां साठी बांधकाम करणे कामात प्लॉटधारकाना प्रोत्साहित करणेस मदत करणेत येईल असे अक्कलकोटे यांनी सांगितले .


तसेच ज्या ठिकाणी ओपन स्पेस अतिक्रमण किंवा विक्री असे गैरव्यवहार झाले असतील तर त्या ठिकाणी सर्वतोपरी कायदेशीर मदत मोफत स्वरूपात करून प्लॉटधारकाना त्यांच्या हक्काचा ओपन स्पेस मिळवून दिला जाईल


यावेळी माऊली नगर देशमुख प्लॉट येथील २७ प्लॉट धारक यांनी तात्काळ धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणी करणेसाठी तयारी दर्शवली . या ओपन स्पेस मध्ये या पूर्वी लोकसहभागातून हॉल बांधण्यात आलेल्या आहे परंतु ७/१२ उताऱ्या वर अद्याप नगरपालिका मालकी हक्कात आहे त्यामुळे नियमाप्रमाणे सोसायटी स्थापन करून ओपन स्पेस हस्तांतरित करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आभार प्रदर्शन अविनाश शिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here