आदरणीय पन्नालालभाऊंचा आज वाढदिवस. यानिमित्ताने राष्ट्र सेवा दल (जि उस्मानाबाद ) कार्याध्यक्ष विलास वकील यांनी त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत …
वयाची 87 वर्ष पूर्ण करून 9 जुलै 20 रोजी 88 व्या वर्षात पदार्पण करणारे आदरणीय व्यक्तीमत्व पन्नालालजी सुराणा (भाऊ) यांना वाढदिवसाच्या आभाळभर सुभेच्छा .

सामाजिक क्षेत्रात आयुष्यभर झोकून ,कसलाही स्वार्थ न ठेवता समाजात शांतता, सुव्यवस्था नांदावी, संविधानाचे मार्गाने देश घडावा, शोषणविरहीत समाजाची जडणघडण व्हावी, शेती,शेतकरी यांचे प्रश्न सुटावेत, शिक्षण, पर्यावरण, आर्थिक प्रश्न ,अनाथ, दलित, वंचित घटक या सर्वच बाबतीत अहोरात्र चितंन,लेखन, चर्चा करत ,सक्रिय कार्यकर्तेंचे संघटन बांधून त्यांना आवश्यक बळ व प्रेरणा व मदत करणारे ,असे बहुआयामी व्यक्तीमत्व.
समाजकारण, राजकारण , अर्थशास्त्र विषयात सक्रीय कामे करत, सोशलिस्ट पार्टी ,राष्ट्र सेवा दल व अशा सर्व परिवर्तनाच्या चळवळीतील संस्था, संघटनामधे सक्रिय वावर अव्याहत ठेवत 88 व्या वयात ही व लाँकडाऊनच्या काळात ही आपलं घर नळदुर्ग प्रकल्पातील मुलांबरोबर लैझीम ,दांडीया खेळत शाखेवर मुलांना देशप्रेम ,देशसेवेचे धडे देण्याचं काम आजही करणारे 88 वर्षाचे तरुण सेवा दल सैनिक पन्नालालजी.

खरंच भाऊ आम्हा तरुण कार्यकर्ते ना प्रेरणा व प्रचंड आशावाद देणारे, सत्य, अहिंसा, क्षमा, शांती,अन्यायाचा शांततामय मार्ग, म्हणजे काय असते त्याचे दर्शन व धडे आपण देण्यात कसूर न करता अंहकारादी विकारांवर कसा संयमाने विजय मिळवत माणूस म्हणून माणसासारखं जगायचं , सुखी व समाधानी व अन्यायाचा प्रतिकार व देश व आपलं नागरिक म्हणून चे कर्तव्य या सर्व गोष्टी आपण आपल्या आचरणातून आम्हाला शिकवल्या. अभिमान वाटतो या कार्याचा, सलाम या कर्तत्वाला.
1934 साली बार्शी येथे मारवाडी व्यापारी कुटुंबात पन्नालालजींचा जन्म झाला . बार्शीतच 10 वी पर्यंत चे शिक्षण व सेवा दल शाखेत देशसेवेचे धडे गिरवले.शाखा नायक ते राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून दाखवली .पत्रकार ते संपादक दै.मराठवाडा योगदान दिले . जनता दल ,समाजवादी जनपरिषद ते सोशलिस्ट पार्टी पुनर्जीवित करून संसदीय अध्यक्ष पदाची धुरा वाहीली. लिखाण ,पत्रव्यवहार , नित्यनेमाने करत अखंड प्रवास करणाऱ्या व सामाजिक कार्याचा रथ चालण्यासाठी अविरतपणे धडपड तरुण पिढीला लाजवेल अशी.


मग आश्चर्य वाटते हे कसं जमलं भाऊंना तर भाऊंच्या शब्दात सांगायचे तर , व्यायाम, योग्य साधा आहार, आवश्यक झोप घेतो.
पहाटे चार ला उठून कामाला लागायचे रात्री 10 वाजेपर्यंत हा क्रम आजही चालू आहे. कार्यकर्त्यांसाठी पुस्तके प्रकाशित करणे वितरित करणे अशी अखंडित सेवा चालू आहे.
देशभरातील सर्वच क्षेत्रातील अनेकांच्या संपर्क, भेटी ,चर्चा, आदानप्रदान यात मैत्रीपुर्ण संबंध सतत ठेवून खूप खूप वेगवेगळ्या क्षेत्रात पन्नालालजींचे कार्य आजही चालू आहे . प्रश्न समोर आला की सोडवल्याशिवाय त्या प्रश्नालाच सुट्टी न देणारे भाऊ . न थकवा, न ऊन, वारा,पाऊस यांच्या बद्दल ची भीती, ना कसल्या ,सुविधा चा मोह.

सुराणा वयाच्या नवव्या वर्षापासून आजपर्यंत राष्ट्रसेवादलाशी संबंधीत आहेत. सोशालिस्ट पार्टीचे ते या वयातही सक्रीय कार्यकर्ते आहेत. एसटी कामगार संघटना, बार्शीतील मिल कामगार, आदिवासींचे प्रश्न, राजकारणाशिवाय समाजप्रबोधनासाठी संस्थांत त्यांनी सक्रीय सहयोग दिला आहे. बार्शीत झालेल्या 54 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांना महत्वाचा वाटा होता. लेखक म्हणूनही समाजप्रबोधनात त्यांनी योगदान दिले आहे.
मला माझ्या मनाप्रमाणे काम करता येत असल्याने मी समाधानी आहे, असे सांगून ते म्हणाले, “देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आर्थिक नियोजनामुळे शिक्षण प्रसार झाल्याने मागास समाजघटकांत परिवर्तन झाले. सध्याचा काळ हा समाजाच्या अभिसराणाचा काळ आहे. जागतिकीकरणाचे कष्टकऱ्यांचे प्रश्न तीव्र झाले आहेत. महाराष्ट्रात बीड, बुलढाण्याला अजून रेल्वे नाही. दुसरीकडे अमेरिका, जपानची नक्कल करण्यासाठी बुलेट ट्रेन आणली जात आहे. देशाचा विकास समतोल झाला पाहिजे. डॉक्टर भ्रष्टाचारी झालेले दिसतात. सरकारी कर्मचारी काम करत नाहीत. शेतकऱ्यांना बॅंकात नीट वागणूक मिळत नाही, असे असले तरी अनेक ठिकाणी परिवर्तनासाठी तरुणांचे गट कार्यरत आहेत. तीच माझी आशा आहे,” असे त्यांनी वेळोवेळी बोलताना नमूद केले.

बुध्द, बस्वेश्वर, संत तुकाराम ,रयतेचा राजा शिवछत्रपती, शाहू,फुले, गांधी,आंबेडकर ,यांची शिकवण सतत सेवा दल सैनिकांना देण्यात खंड पडू दिला नाही.
आपणास दिर्घआयुष्य लाभो ही सदिच्छा
विलास वकील
कार्याध्यक्ष
राष्ट्र सेवा दल जिल्हा उस्मानाबाद
9527403296