वारीच्या तोंडावर पंढरपुरात 7 नवे कोरोनाबाधित आढळले ; एकूण आकडा झाला नऊ

0
368

ग्लोबल न्यूज । पंढरपूर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आज वाढली असून आणखी 7 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. यामध्ये बँकेच्या 2 संचालकांसह गाडीचा चालक ही बाधित झाला आहे.

एका बँकेचा संचालक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीला कोरोना झाला असून त्याच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क लोकांची लक्षणे पाहून swab तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये एका राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष, एक व्यापारी आणि एका वाहन चालकाचा समावेश असल्याचे समजते. यामुळे शहरातील रुग्णांची एकूण संख्या 9 झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या इसमाची आरोग्य तपासणी केलेल्या पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दोन दिवसांपूर्वी शहरातील शिक्षक असलेला नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याची आरोग्य तपासणी डॉक्टर असलेल्या तहसीलदार वाघमारे यांनी केली होती. त्यांनीच लक्षणे तीव्र असल्याने swab तपासणीसाठी शिफारस केली होती. त्या इसमाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तहसीलदार वाघमारे यांचाही swab तपासणी साठी दिला होता. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील प्रशासन “टेन्शन फ्री ” झाले आहे.

दशमीच्या पूर्वसंध्येला संतांच्या पादुका पंढरपूर मध्ये येण्याचे नियोजन सुरू असताना शहरांमध्ये अचानक 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे . पंढरपूरचे सर्व प्रशासन राबविणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्याच्या चालकाचाही यामध्ये समावेश आहे . त्यामुळे आता संबंधित अधिकारी देखील विलगीकरणा मध्ये गेलेले आहेत.

पंढरपुरातील एका सहकारी बँकांच्या संचालक मंडळाचे काल स्वॅप घेण्यात आले होते , त्यातील 5 संचालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

सुदैवाने हे पाचही जण सध्या प्रशासनाने विलगीकरण मध्ये ठेवले आहेत. येथील एका खासगी रुग्णालयातील व्यक्तीदेखील पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईहून चित्रीकरणासाठी आलेला कॅमेरामन बँकेचे संचालक पाच ड्रायव्हर एक आणि हॉस्पिटल मधील एक जण असेच सात नवे रुग्ण सापडले आहेत.

मंगळवेढा टाइम्स साभार

Pandharpur city On the eve of Ashadi Wari, 7 new corona were found

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here