उस्मानाबाद जिल्हा : कोरोनाचे 17 अहवाल पॉझिटिव्ह ; उस्मानाबाद शहर आणि भूम मधील स्तिथी चिंताजनक
उस्मानाबाद- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णाची दिवसेंदिवस वाढत असून आज तब्बल 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे व डॉ सतीश आदटराव यांनी दिली आहे.यात सर्वाधिक 10 रुग्ण हे भूम तालुक्यातील असून 5 जण हे उस्मानाबाद शहरातील आहेत.

उस्मानाबाद तालुक्यात सहा रुग्ण सापडले असून त्यातील दोन झोरे गल्ली येथील असून पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत व एक रुग्ण राम नगर येथील आहे तर दोन समता कॉलनी येथील आहेत . तालुक्यातील कनगरा येथे एक रुग्ण सापडला आहे.

उमरगा तालुक्यातील माडज येथे एक रुग्ण असून येथील असून ती लातूर येथे उपचार घेत असून तिचा स्वॅब लातूर येथे घेण्यात आला आहे.भूम तालुक्यात सर्वाधिक 10 रुग्ण असून त्यापैकी एक भूम शहरातील असून तो पुण्यावरून आलेला आहे व बाकीचे नऊ रुग्ण हे राळेसांगवी येथील असून एकाच कुटुंबातील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 311 रुग्ण सापडले असून त्यातील 200 रुग्ण हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर 97 जणांवर उपचार सुरू आहेत. 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.