बार्शीत रविवारी पहिल्या सायक्लोथॉन चे आयोजन

0
330

बार्शीत रविवारी पहिल्या सायक्लोथॉन चे आयोजन

रोटरी,लायन्स,इनरव्हील क्लब,निर्भया पथक व बार्शी सायकलींग क्लबचा उपक्रम

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी  प्रतिनिधी : 

लायन्स क्लब बार्शी टाऊन, रोटरी क्लब बार्शी, इनरव्हील क्लब ऑफ बार्शी, बार्शी सायकलींग क्लब व निर्भया पथक बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदुषण टाळा, तुदुरुस्त रहा, व ट्रॅफिक जामपासून सुटका मिळवा हे महत्वुपर्ण उद्देश समोर ठेवून बार्शीच्या इतिहासात पहिल्यादांच रविवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता बार्शी सायकलोथॉन २०२१ चे आयोजन केले असल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन अमित इंगोले यांनी दिली.


याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा हेमा कांकरिया, सचिव गुंजन जैन,गौरी रसाळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश चौहान, निलेश सरवदे, प्रदीप बागमार, अनिल बंडेवार, विजयश्री पाटील, गोविंद बाफना, अभिजित तांबारे,निर्भया पथकाचे पोहेकॉ.विकास माने, आनंद बेदमुथा आदी उपस्थित होते.

ही स्पर्धा विद्यार्थी गट आणि खुला गट अशा दोन गटात होणार आहे. या निमीत्ताने बार्शीच्या इतिहासात प्रथमच सामाजिक करणारे लायन्स व रोटरी क्लब एकत्र आले आहेत. शिवाजी महाविद्यालय परिसरातून या सायक्लोथॉनचा शुभारंभ होणार आहे.प्रत्येकांनी आपली सायकल आणायची आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.

🚴 Barshi Cyclothon 2021 🚴
Sunday, 24th January, 2021
🚴 Track :- 4 km (Open for all ages) and 16 km ( Age limit 13+ years)
🚴 Route(4km):-Starts From- Shivaji College-Court-Bhagavant Mandir-Mahadwar Chouk-Lokhand Galli-Panche khut- saraf galli- Vasant Book Depo-Pande chouk- Nagarpalika-Court- Shivaji College- Finish
🚴 Route (16 km) :- Starts from – Shivaji college – Upalai road – Bypass – HP Petrol Pump – Ring road – Subhash Nagar – Bhosale chowk – Post Office chowk – Pande chowk- Court- Shivaji college – Finish
🚴 🏅 Medals For registered participants
🚴 Use any kind of bicycle (Service bicycles the previous day)

🚴 Reporting time :- 6 am
🚴 Warm up & Zumba :- 6 am
🚴 Group formation:- 6:15 am
🚴 Energy kit distribution :- 6:30am
🚴 Start :- 6:45 am
🚴 End:- 9am
🚴 Stretching exercise
🚴 Medal distribution
🚴 Finish

🚴 Registration :- Online or Offline
🚴 Entry fee 50/-
🚴 Registration deadline 22 Jan, 3 pm
🚴 For offline registration :- Shriram Plywood, Shivaji college road , Barshi
🚴 Registration link :- https://qrgo.page.link/pGmda
🚴 Google pay no-9689122561

Organisers :-
Lions Club Barshi Town
Rotary Club Barshi
Innerwheel Club Barshi
Barshi Cycling Club
Nibhaya Police Pathak Barshi

For more details :-
Abhijeet Tambare – 9445917482
Gouri Rasal – 9960273331

खुल्या गटासाठी सोळा किलोमिटर तर लहान गटासाठी चार किलोमिटर अंतरासाठी ही स्पर्धा होणार आहे. यावेळी ग्रामीण भागातून शहरात दरारोज सायकलकवर येणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शहरात नियमितणे सायकल वापरणाऱ्याचा ही सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी तज्ञ मान्यवर सायकल वापरण्याचे फायदे उपस्थितांना सांगणार आहे. ही केवळ स्पर्धा नसून वाढत्या ध्वनी आणि वायु प्रदुषणालाआळा बसावा, तंदुरुस्त राहावे, व लोकांमध्ये वाहनापेक्षा सायकल बरी याविषयी जनजागृती होण्याच्या उद्देशानेच या सायक्लोथॉनचे आयोजन केल्याचे गौरी रसाळ यांनी यावेळी सांगीतले. जास्तीत-जास्त बार्शीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन हेमा कांकरिया यांनी केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here