बार्शीतील ११४ तरुणांची दिड कोटीची फसवणूक सात जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0
525

बार्शीतील ११४ तरुणांची दिड कोटीची फसवणूक सात जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

साखळी पद्धतीने होता व्यवसाय 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी :

बेरोजगार तरुणांना आमिष दाखवून फसविण्याचे अनेक प्रकार घडतात. तसाच प्रकार बार्शी शहरासह तालुक्‍यात घडला असून, फ्यूचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. या मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून 114 बेरोजगार तरुणांची 1 कोटी 43 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश येथील सत्र न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी पोलिसांना दिले आहेत.

 

फ्यूचर मेकर लाईफ केअर प्रा. लि., राधेशाम सथार (रा. हिस्सार, हरियाणा), बन्सीलाल सिहांग (रा. अहमदपूर, फतेहबाद), जयराम अहिल शिंदे (विभागीय व्यवस्थापक, खेडले काजळी, ता. नेवासा, जि. अहमदनगर), सागर उत्तम घोलप (विभागीय व्यवस्थापक, मोशी, पुणे), आदिल दस्तगीर सय्यद (एजंट, रा. शेंद्री, ता. बार्शी), ज्ञानोबा जाधवर (एजंट, रा. चुंब, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बार्शी पोलिसांना दिले आहेत. 

मिथिलेश मिलिंद दीक्षित यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. फ्यूचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. या हरियाणस्थित कंपनीचा चेन ऑफ सुपर मार्केटिंगचा भारतातील 23 राज्यांत व्यवसाय होता. चेन व्यवसायातून भरपूर पैसे मिळतात, असे आमिष दाखवून बार्शी व आसपासच्या परिसरातील बेरोजगार तरुणांना कंपनीचे एजंट बनवले. ही घटना 31 जानेवारी 2018 ते 7 सप्टेंबर 2018 अशा अवघ्या आठ महिन्यांत घडली आहे. 

सात हजार रुपये कंपनीत जमा केले तर दोन नवीन सभासद करायचे अन्‌ दरमहा कंपनी तुम्हाला 1 हजार 500 रुपये देईल, 1 लाख 95 हजार गुंतवले तर दरमहा 24 हजार रुपये तर 3 लाख गुंतवणूक केली तर दरमहा 48 हजार रुपये कंपनी परतावा करेल. तसेच तीन वर्षांनी मूळ भरलेली रक्कम मिळेल, असे आमिष कंपनीकडून दाखवण्यात आले होते. 

शहर तालुक्‍यातील 114 तरुणांनी येऊन सुमारे 1 कोटी 43 लाख रुपये गुंतवले होते. कबूल केल्याप्रमाणे कंपनी व एजंट यांच्याकडून गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही. कंपनी विरोधात देशभर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याने व कंपनी बंद पडल्याने दीक्षित यांनी पोलिसांत धाव घेतली. पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने येथील सत्र न्यायालयात फिर्याद दाखल केली. गुंतवणूकदार, फिर्यादीच्या वतीने ऍड. प्रशांत एडके, ऍड. समाधान सुरवसे, ऍड. सुहास कांबळे अॅड सर्फराज इनामदा,सुरज वाणी यांनी काम पाहिले. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here