बार्शी : राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणात, नगरसेवक विजय राऊत यांच्यासह तीन जणांविरोधात प्रोसेस इश्युचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिलेले आदेश कायम ठेवण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशास आव्हान देणारी याचिका राऊत यांनी उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान मागे घेतली. न्या. नितीन जामदार यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.
मंगळवार दि.२६ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी अक्कलकोटे यांच्यावतीने अॅड. अभिजित कुलकर्णी तर राऊत यांच्यावतीने अॅड. हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून काही निरीक्षण नोंदवत राऊत यांना निर्णयाची इच्छा आहे की अपील मागे घेताय अशी विचारणा केल्यानंतर दुपारी अडीच पर्यंतची वेळ निंबाळकर यांनी मागून घेतली.

त्यानंतर न्यायालयात अॅड. निंबाळकर यांनी, राऊत यांची अपील मागे घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने अपील काढून टाकल्याचे जाहीर केले आहे.
बार्शी प्रथम वर्ग न्यायालयाने २८ एप्रिल रोजीचे समन्स काढून आरोपीने हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.