आशावादी बातमी ; एम्समध्ये आजपासून कोरोना कोवॅक्सिन स्वदेशी लसीची मानवी चाचणी झाली सुरू

0
192

आशावादी बातमी ; एम्समध्ये आजपासून कोरोना कोवॅक्सिन स्वदेशी लसीची मानवी चाचणी झाली सुरू

आशावादी बातमी ; भारतात स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. ३० वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.

स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. मानवी चाचणी कऱण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली.

एम्सचे लस विभाग प्रमुख डॉ. संजय राय म्हणाले की, आज फक्त एका व्यक्तीवर प्रयत्न केला गेला आहे. त्याला घरी पाठवण्यात आले आहे, परंतु येत्या सात दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील. उर्वरित सहा जणांना शनिवारी बोलावण्यात आले आहे.

राय म्हणाले, ‘दिल्लीहून आलेल्या पहिल्या व्यक्तीची दोन दिवसांपूर्वी तपासणी केली गेली होती आणि त्याचे सर्व आरोग्य मापदंड सामान्य श्रेणीत असल्याचे आढळले होते. त्याला इतर कोणताही आजार नाही. इंजेक्शनमधून 0.5 मिलीचा पहिला डोस त्यांना दुपारी दीडच्या सुमारास देण्यात आला.

अद्याप कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. त्याच्यावर दोन तास देखरेखीखाली असून येत्या सात दिवस त्यांचे परीक्षण केले जाईल. क्लिनिकल ट्रायलमध्ये आणखी काही सहभागींचा अहवाल तपासल्यानंतर त्यांना शनिवारी लसी दिली जाईल.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) ‘कोवेक्सिन’ च्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी एम्ससह १२ संस्थांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात 5 375 लोकांची चाचणी घेण्यात येणार असून यातील जास्तीत जास्त १०० एम्सचे असतील.

राय यांच्या मते, दुसर्‍या टप्प्यात सर्व 12 संस्थांमधील एकूण 750 लोक सामील होतील. पहिल्या टप्प्यात, 18 ते 55 वर्षे वयोगटातील निरोगी लोकांवर या लसीची चाचणी केली जाईल ज्यांना इतर कोणताही आजार नाही.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, दुसर्‍या टप्प्यात ही परीक्षा 12 ते 65 वर्षे वयोगटातील 750 लोकांवर केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here