राज्यातील विरोधी पक्षाला दिल्लीतील कोरोना परिस्थितीची चिंता
शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार फंड दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असे म्हणत फडनवीसांना टोला लगावला आहे.


संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकतेच फडणवीस आणि त्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेल्याची आठवण करून दिली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी ते दिल्लीतील कोरोनाची पाहणी करण्यासाठी गेले असतील असे म्हंटले. तसेच ते सध्या प्रत्येक गोष्ट दिल्लीत करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्याचा आमदाराकीचा फंडही दिल्लीतच दिल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला.
यावेळी खासदार राऊत यांनी आपण मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रालयात कितीवेळा गेला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले की, तंत्रज्ञान उपलब्ध असून उपयोग न करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. मी घराबाहेर पडत नाही, असा आरोप करणारे विमानातून न जाता बैलगाडीतून का जात नाही. जर तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही, तर मग शोध का लावतात?” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.